Ticker

6/recent/ticker-posts

संतती नियमनाचे भारतातील आद्यप्रवर्तक रघुनाथ धोंडो कर्वे यांची थोडक्यात माहिती- माझा महाराष्ट्र

संतती नियमनाचे भारतातील आद्यप्रवर्तक रघुनाथ धोंडो कर्वे यांची थोडक्यात माहिती

रघुनाथ धोंडो कर्वे 
                  आज आपण रघुनाथ धोंडो कर्वे यांच्या जीवनाविषयी जाणून घेणार आहोत. रघुनाथ धोंडो कर्वे हे गणिततज्ञ आणि महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक होते. हे धोंडो केशव कर्वे यांचे जेष्ठ पुत्र होते. रघुनाथ यांनी वयाच्या 29 वर्षाच्या आश्रमातील मालतीबाई यांच्याशी लग्न केले. मालतीबाईंचे आश्रमात येण्यापूर्वीचे नाव गंगू गोडे असे होते. गोपाळ गणेश आगरकरांनी 1882 मध्ये केसरीतील 'स्त्री दास्य विमोचन' या निबंधमधून संततीनियमानाचा विचार मांडला होता. त्या काळी समाजामध्ये संततीनियमानाचा विचार सुद्धा गुन्हा समजला जात होता. तरीही अश्या परिस्थितीत त्याकाळी त्यांनी संततीनियमानाचा कार्य नियमितपणे त्यांनी चालूच ठेवले. रघुनाथ कर्वे यांचा जन्म 14 जानेवारी 1882 साली रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड या गावी झाला. वडिलांचे नाव धोंडो केशव कर्वे तर आईचे नाव राधाबाई धोंडो कर्वे असे होते. रघुनाथ यांचे शिक्षण पुणे येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे झाले होते. त्या नंतर 1899 साली दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले. 1904 मध्ये फर्ग्युसन कॉलजमधून बी.ए. पूर्ण केले. तसेच 1919 गणितातील पीएचडीसाठी पॅरिसला गेले होते. पण ती पदवी ना मिळवता त्यांनी एकाच पदविकावर समाधान मानून राहिले. 1906 साली मुंबई ट्रेनिंग कॉलेजात घेण्यासाठी आलेले असताना त्यांचे प्रोफेसर नेल्सन फ्रेझर यांच्याशी भेट झाली. 

               रघुनाथ कर्वे यांनी गणिताचे प्राध्यापक म्हणून मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात नोकरी केली. तसेच कुटुंब नियोजन, लोकसंख्येला आळा घालणे, लैंगिक सुखाचे स्त्रियांचे अधिकार यांचे सगळ्यांचे महत्व सांगत असत. त्यामुळे महाविद्यालयातील रुढीवादी प्राचार्यांनी त्यांना त्यांच्या नोकरीचा राजीनामा द्यायला भाग पडले. त्यांनी राजीनामा दिला पण त्यांनी वरील प्रश्नासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. रघुनाथ रावांनी संतती नियमनाविषयी समाजामध्ये बरेच कार्य केलेले आहे. त्यामुळे रघुनाथ धोंडो कर्वेना 'संतती नियमनाचे भारतातील आद्यप्रवर्तक' म्हणून ओळखले जाते. त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या मातोश्रींचा मृत्यू झाला. यामुळे रघुनाथ रावांना असे वाटत होते की स्रियांना गर्भधारणेच्या वेळी त्यांना व्यवस्थित शिक्षण मिळावे अशी त्यांची इच्छा होती. तेव्हाच्या काळात संतती नियमन कुजक्या व नसल्या मानल्या जाणाऱ्या गोष्टीला कुठलीही सामाजिक मान्यता नव्हती. अश्या काळामध्ये रघुनाथ कर्वेन्नी सामाजिक सुधारण्याचा आग्रह धरून समाजामध्ये संततीनियमन होणे आवश्यक आहे. त्यासंबंधी कायदा करून त्याचा उपयोग केला जावा असे मत रघुनाथ धोंडो कर्वे यांनी मांडले होते. 

                  समाज स्वास्थ्यासाठी संततीनियमन व लैंगिक शिक्षण यासंबंधी रघुनाथ धोंडो कर्वे यांनी केलेले विचार प्रबोधन, मत प्रबोधन प्रत्यक्ष कार्य फार मोलाचे आहे. त्या काली संतती नियमानला उपचारही करणे निषिद्ध मानले जायचे. रंगुनाथ रावांनी याविषयाचा प्रचार करून जनजागृती करण्याचे ठरवले.

                  रघुनाथ रावांना लहानपणापासून वाचनाची गोडी होती. तसेच अवांतर वाचनाची सवय देखील लागली होती. त्यामुळे कर्वे यांनी अनेक शास्त्रीय पुस्तके वाचनालयातून आणली. स्त्री मुक्ती, स्त्री शिक्षण, स्त्री-पुरुष संबंध याबाबतही कर्वेचा अतिशय पुरोगामी दृष्टिकोन होता. व वैद्यकीय नवीन संशोधनाने कमी होत चाललेले मृत्यू दर व अनिर्बंध वाढत असलेली लोकसंख्या संतती नियमनाची गरज लक्षात घेऊन रघुनाथ कर्वे यांनी इसवी सन 1921 साली इंग्रजीत एक पुस्तक प्रकाशित केले होते. "संततीनियमन" ह्या विषयावर संशोधन करून आपल्या राहत्या घरीच संततीनियमनाची साधने बनवून देण्याचा यांनी आधुनिक उपक्रम सुरू केला होता. त्यांनी आपल्या पत्नीला (मालती रघुनाथ कर्वे) सोबत घेऊन कुटुंब नियोजन केंद्र सुरू केले. त्यांनी पुस्तकांमधून "वेश्याव्यवसाय" व "आधुनिक आहारशास्त्र" या पुस्तकातून लैंगिक रोगाची लक्षणे, कारणे आणि उपाय सांगितले. स्वतःला एकही मूळ नसताना कर्वे यांनी शस्त्रक्रिया करून घेतली तव त्यांच्या पत्नीनेही त्यांना थोर मनाने संमती दिली. 

  

           तर मित्रांनो अश्या या थोर समाजसुधारकास त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 

 (अश्यायाच प्रकारच्या माहितीसाठी माझ्या ब्लॉगला Follow आणि Subscribe करा.) 

                                                       -धन्यवाद 

  (स्रोत- Google, विकिपीडिया)                       

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

मोबाईल हरवण्याची चिंता आहे? तर आता चिंता नको.