भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची थोडक्यात माहिती ( भाग - १) - महाराष्ट्र माझा
![]() |
| डॉ. बाबासाहेब आंबेडकर |
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर बाबासाहेबांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेश मधील महू या गावी झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे हे त्यांचे मूळ गाव आहे. लष्करात नोकरीत असणारे त्यांचे वडील पुढे साताऱ्यात स्थायिक झाले. बाबासाहेबांचे बालपण पूर्ण सातारा येथे गेले. त्यानंतर मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून बाबासाहेबांचे कुटुंब पूर्ण मुंबईला आले.इसवी सन १९०७ मध्ये बाबासाहेब मॅट्रिकची परीक्षा पास झाली त्यानंतर १९१२ मध्ये मुंबईच्या कॉलेजमधून ते बी.ए ची परीक्षा पास झाले. त्यानंतर १९१३ मध्ये उच्च शिक्षणासाठी बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेस गेले. तेथील कोलंबिया विद्यापीठात त्यांनी अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र या विषयांचा अभ्यास केला. त्यानंतर १९१५ मध्ये बाबासाहेबांनी कोलंबिया विद्यापीठांमध्ये एम.ए ही पदवी घेतली. त्यानंतर त्याच विद्यापीठाने त्यांना उत्कृष्ट प्रबंधाबद्दल पीएचडीची पदवी बहाल केली. अमेरिकेतील अभ्यास पूर्ण करून बाबासाहेब आंबेडकर कायदा व अर्थशास्त्र यांचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडला गेले. परंतु आर्थिक अडचणीमुळे तेथील शिक्षण अर्धवट सोडून त्यांना भारतात परतावे लागले. काही काळ त्यांनी बडोदा संस्थानात नोकरी केली. त्याचवेळी त्यांनी सार्वजनिक कार्यामध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली. माणगाव व नागपूर येथे भरलेल्या अस्पृश्यता निवारण परिषदांमध्ये ते सहभागी झाले. इसवी सन १९२० साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुन्हा इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी बी.एससी. व डी.एससी. या संपादन केल्या. याच काळात त्यांनी बार ऍट लॉ म्हणजे बॅरिस्टरची पदवी प्राप्त केली.१९२३ मध्ये भारतात परतले. मग त्यांनी आपले सार्वजनिक काम अधिक जोमाने सुरू केले. १९२४ मध्ये त्यांनी बहिष्कृत हितकारणी सभा या संस्थेची स्थापना केली. समाजसुधारणेचे कार्य करू लागले. इसवी सन १९२७ मध्ये मुंबई कायदेमंडळाचे सदस्य म्हणून नियुक्त झाले. येथून त्यांचा राजकीय जीवनात प्रारंभ झाला. डॉ. बाबासाहेबांच्या काळात भारतात चातुर्वर्ण, जातिभेद, अस्पृश्यता, सरंजामशाही या वाईट वृत्तींचे अधिराज्य होते. डॉ. बाबासाहेबांनी आपल्या तेजस्वी विचारांनी या समाजाचा प्राण्यांमध्ये फुंकर घालून चेतना आणली. त्यांनी आपल्या अस्पृश्य बांधवांना आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार व न्याय हक्कासाठी संघर्ष करण्यात जागृत केले. अस्पृश्य ही याच देशाचे नागरिक आहेत व या देशावर इतर नागरिक आहेत त्यांचाही तितकाच नागरिकत्वाचा अधिकार आहे. अशी भीमगर्जना बाबासाहेबांनी केली.
![]() |
| चवदार तळ्याचे पाणी सत्याग्रह |



0 टिप्पण्या