Ticker

6/recent/ticker-posts

किल्ला म्हणजे काय? आणि त्याविषयी थोडक्यात पण महत्वपूर्ण माहिती - माझा महाराष्ट्र

किल्ला म्हणजे काय? आणि त्याविषयी थोडक्यात पण महत्वपूर्ण माहिती.

किल्ला 


        कि
ल्ला म्हणजे काय? किल्ला पाहायचा कसा? त्यांचे प्रकार किती? किल्ला आपण कसा बघावा? याचे पण एक तंत्र आहे. त्याविषयी आपण सविस्तर माहिती या भागांमध्ये आपण बघणार आहोत. तर याठिकाणी आपण सर्वात पहिले माहिती घेऊया किल्ला म्हणजे काय? महाराष्ट्राच्या पश्चिम भागात सह्याद्री पर्वत आहे. याच परिसरात आपल्याला सर्वाधिक किल्ले बघायला मिळत असतात. डोंगर कडे व कपारी मध्ये किल्ले का बांधले असावेत? असा आपल्याला नेहमी प्रश्न पडतो. आणि याच प्रश्नाचे उत्तर आपण आता बघणार आहोत. तर जिथे राहून शत्रूच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवता येईल. व वेळ प्रसंगी शत्रूवर हल्ला करता येईल. आणि सर्वात महत्वाचं आपलं संरक्षणही होईल अशा ठिकाणी आपल्याला किल्ले बांधलेले दिसतात म्हणजेच इतिहासात स्वतःचे साम्राज्य शत्रूपासून सुरक्षित ठेवण्यासाठी आणि वेळप्रसंगी बांधण्यात आलेले अशाच ठिकाणांना 'किल्ला' असे म्हणतात.


किल्ल्याचे प्रकार खालील प्रमाणे आहेत.

किल्ले ज्या ठिकाणी बांधण्यात आलेले आहेत. त्या बांधण्याच्या ठिकाणांवरून किल्ल्यांचे प्रकार पडत असतात. या ठिकाणी सविस्तर माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत.


पहिला प्रकार जो आहे. तो म्हणजे 'गिरीदुर्ग' म्हणजेच डोंगरात बांधण्यात आलेला किल्ला. समुद्रात बेटावर बांधण्यात आलेला किल्ला म्हणजे 'जलदुर्ग'.  आणि भूदुर्ग म्हणजे सपाट भागावर बांधण्यात आलेला किल्ला. परंतु याव्यतिरिक्त देखील किल्ल्यांचे काही प्रकार आहेत. वनदुर्ग म्हणजे अरण्यात असलेला किल्ला. गव्हर, कर्दम तसेच  कोठ किंवा गढी स्वरूपातील इमारती किल्ल्याप्रमाणेच मानल्या जातात. 


महाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास- 

महाराष्ट्र असा प्रदेश आहे ज्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रदेशातील परकीयांनी राज्य केलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात बांधण्यात आलेल्या किल्ल्यावर या परकीयांच्या बांधकाम कौशल्य दिसून येते. महाराष्ट्रात बांधण्यात आलेल्या किल्ल्यांमध्ये आफ्रिकन लोकांपासून ते युरोपियन लोकांपर्यंत सर्वांच्या कौशल्याचा सहभाग आहे. २००० वर्षांपूर्वीच्या सातवाहन राजवंश पासून ते राष्ट्रकूट, चालुक्य, शिलाहार, यादव, कदंब, बहमनी, मोगल दक्षिणी पातशाह्या, मराठेशाही, पेशवाई, पोर्तुगीज आणि इंग्रज अशा वेगवेगळ्या काळातल्या सत्ताधीशांनी किल्ले बांधलेले आहेत. 


किल्याचे महत्वाचे भाग -


 किल्ला बांधत असताना किल्ला बांधण्याची जागा हेरत असताना विशेष काळजी घेतली जात असते. त्यानुसार किल्ला बांधलेला जागेचे चार भाग पडतात. 

1) 'घेरा'- किल्याच्या पायथ्याजवळ असलेले गाव.

2) 'मेठ' - किल्ला आणि किल्ल्याजवळील असणारे गांव यांच्यामधील मोक्याची तटबंदीरहित जागा.

3) 'बालेकिल्ला' -  म्हणजे किल्ल्यावरील सर्वात संरक्षित जागा.

4) 'माची' - बालेकिल्याखालील सपाट जागा.

कुठल्याही किल्ल्यामध्ये प्रवेश करण्यासाठी एक मुख्य दरवाजा असतो. त्याला 'महादरवाजा' असे म्हणतात. काही किल्ल्यांवर महादरवाच्या संरक्षणासाठी बुरुजांची रचना केलेली असते. 

तर काही किल्ल्यांवर एकामागोमाग एक अनेक दरवाजे असे पाहायला मिळतात. 


देवडी - प्रवेशद्वाराच्या आतील बाजूला पहारेकऱ्यांना बसण्यासाठी एक जागा ठेवलेली असते त्याला 'देवडी' असे म्हणतात. 

नगारखाना 
नगारखाना - किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर नगारखाना असतो. गडाची दार उघडताना आणि बंद करत असताना तसेच महत्त्वाच्या प्रसंगी येथे नगारे वाजवली जात असे.
तटबंदी 

तटबंदी - किल्ल्याची माची आणि बालेकिल्ला या भागात दगडी बांधकामात बांधण्यात आलेल्या भिंती आहेत. या भिंतींना 'तटबंदी' असे म्हणतात. किल्ल्याच्या दिशेने तोफेच्या गोळ्याच्या मारा झाला तर किल्ल्यावर त्याचा परिणाम कमी व्हावा याकरिता तटबंदीची भिंत नागमोडी बांधलेली असते. किल्ल्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने तटबंदी महत्वाचे काम करते. तर किल्ल्याच्या तटबंदीवर पहारेकऱ्यांना गस्त घालण्यासाठी जी जागा ठेवलेली असते. त्याला फांजी असे म्हणतात. तटबंदी मध्येच पण काही ठराविक अंतरावर तटबंदी पासून पुढे आलेले बुरुज बांधलेले असतात. हे बुरुज काही किल्ल्यावर अर्धगोलाकार, त्रिकोणी, षटकोनी तर काही किल्ल्यावर कमळाच्या फुलाच्या आकारात बांधण्यात आलेले आहेत. बुरुजावर तोफा ठेवल्या जातात.तटबंदी आणि बुरुज यामध्ये काही ठिकाणी छिद्रे ठेवलेली असतात त्यांना 'जंग्या' असे म्हणतात. यांचा उपयोग बुरुजावरून गोळीबार करण्यासाठी होतो.


चोरदरवाजा-  प्रत्येक किल्ल्यावर येण्यासाठी एक महादरवाजा सोडून इतर एक ते तीन दरवाजा असतात.  छोट्या वाटेचे परंतु चढाईसाठी कठीण असलेल्या  दरवाजास 'चोरदरवाजा' असे म्हणतात. हे चोर दरवाजे तटबंदीमध्ये लपवलेले असतात. छुप्या पद्धतीने केल्या जाणाऱ्या अनेक कामांसाठी या दरवाजाचा उपयोग होत असे.

बालेकिल्ला - बालेकिल्ला याचा मूळ शब्द 'बाला-इ-किल्ला'. म्हणजे गडावरील सर्वात संरक्षित जागा. किल्ला ज्या शिखरावर असेल त्या शिखरावरच्या सर्वात उंच जागी बाले किल्ला असतो. गरज असेल तर बालेकिल्ला तटबंदीने अधिक मजबूत केलेला असतो. क्वचिवत एखाद्या गडावर दोन ते तीन बालेकिल्ले देखील असतात. राजगडावर असलेला हा बालेकिल्ला अतिशय कठीण मानला जातो. 


प्रत्येक गडाला एक देवदेवता असते. किंवा कुठल्याही किल्ल्यावर गेल्यावर एकतरी मंदिर बघायला मिळेल. या किल्ल्यावरील असणाऱ्या मंदिशीवाय आपल्याला आजूबाजूला अनेक साऱ्या देवदेवता दिसतात. ज्या की मूर्ती स्वरूपामध्ये असतात. मारुती, गणपती, महादेव अश्या प्रकारच्या असंख्य देवता आपल्याला पाहायला मिळतात. काही गडकिल्ल्यांवर अनेक ठिकाणी आपल्याला शिलालेख पाहायला मिळतात. जे की त्या-त्या राजवटीमध्ये लिहलेले असतात. त्यामध्ये काहीतरी विशिष्ट माहिती किंवा संदेश लिहलेला असतो. 

माची- हा देखील किल्ल्याच्या बांधणीमधला हा एक महत्वाचा घटक आहे. ज्या गडाचा सपाट विस्तार अधिक त्या गडावर माची हे जास्त असतात. असे गड जास्तीच सुरक्षित असतात. माची म्हणजे गडावरील केलेली सुरक्षित जागा. माचीवर शिबंदी असते. माची त्या-त्या भागाचे संरक्षण करते. राजगडावर संजीवनी माची, पद्मावती माची आणि सुवेळा माची ह्या तीन माच्या पाहायला मिळतात. 

रायगडाच्या किल्ल्यावर कडेलोटची जागा देखील आहे. म्हणजे गुन्हेगाराला शिक्षा म्हणून त्याला त्या लिल्ल्यावरून खाली ढकलून दिले जात असे. किल्ल्यावरून ज्या ठिकान्यावरून खाली ढकलले जात त्या जागेला 'कडेलोटची जागा' असे म्हणत.


(या पोस्टमधील काही फोटो आणि माहिती गुगलवरून मिळवलेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

मोबाईल हरवण्याची चिंता आहे? तर आता चिंता नको.