Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्रातील पाच प्रमुख नद्या - माझा महाराष्ट्र

 नमस्कार मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या प्रमुख पाच नद्या.

नर्मदा नदी
र्मदा नदी -  महाराष्ट्रातील प्रमुख पाचव्या क्रमांकाची नदी आहे. नर्मदा नदी भारतातील सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये नर्मदा नदीचा क्रमांक पाचवा येतो. नर्मदा नदीचा उगम मध्यप्रदेश राज्यातील अमरकंटक येथे होतो. ही नदी भारताच्या मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या तीन राज्यातून वाहते. वाहत नर्मदा नदी हे एकूण १३१२ किलोमीटर वाहते. मध्यप्रदेश राज्यात १०७८ किलोमीटर, महाराष्ट्र राज्यात ७२ ते ७४ किलोमीटर तर गुजरात राज्यात १६० किलोमीटर वाहते. नर्मदा भारतीय उपखंडातील पाचव्या क्रमांकाची मोठी नदी असून सर्वात मोठी म्हणून ओळखली जाते. नर्मदेला रेवा असेही नाव आहे. नर्मदा गुजरात त पश्चिम समुद्रकिनाऱ्यावरील भरूच शहराजवळ खंबायताच्या आखातास म्हणजेच अरबी समुद्रास जाऊन मिळते. नर्मदा नदीवर महत्त्वाची ३० धरणे आहेत. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे भारतातील सर्वात मोठा जलसाठा असलेले धरण 'इंदिरा सागर धरण' तसेच 'सरदार सरोवर' हे देखील महत्त्वाचे धरण आहे. हिंदू धर्मामध्ये नर्मदा नदीला फार पवित्र स्थानी मानले जाते. त्यामुळेच बरेच भाविक नर्मदा नदीची परिक्रमा करतात.
तापी नदी 

तापी नदी - महाराष्ट्रातील प्रमुख चौथ्या क्रमांकाची नदी आहे. तापी नदी भारतातील सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये दहाव्या क्रमांकाची नदी आहे. तापी नदी त्या नदीला ताप्ती असे म्हणतात. तापी नदीचा उगम मध्य प्रदेश राज्यात बैतुल जिल्ह्यात मुलताई येथे होतो. ही नदी मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात या तीन राज्यातून वाहते. त्या नदीचे वैशिष्ट्य भारतातील पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या तीन प्रमुख नद्यांपैकी ही एक आहे. ही नदी ७२४ किलोमीटर वाहते. तापी नदी सुरत शहर शेजारी राल्फ ऑफ खंबात याठिकाणी अरबी समुद्राला जाऊन मिळते. या नदीवर प्रमुख तीन धरणे आहेत. ती म्हणजे उकाई धरण, काकरापार धरण, हातनुर धरण तापी नदीच्या पुर्णा, गिरणा, वाघुरा या तीन उपनद्या आहेत. 
भीमा नदी
भीमा नदी - महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाची नदी आहे भीमा नदी. भीमा नदीचा उगम महाराष्ट्र राज्यातील भीमाशंकर या ठिकाणी होतो. भीमा नदी  ८६१ किलोमीटर वाहते. भीमा नदी कर्नाटकात रायचूर जवळ देव सुगर येथे कृष्णा नदीला जाऊन मिळते. भीमा नदीला उजवीकडून भामा, इंद्रायणी, मुळा, मुठा, निरा तर उजवीकडून घोड व सीना या नद्या येऊन मिळतात. भीमा नदीची नीरा नदी ही उपनदी सोलापूर जिल्ह्यातील नरसिंगपूर नीरा या गावाजवळ भीमाला मिळते. मुळा-मुठा आणि भीमा नदीचा संगम रांजणगाव सांडस येथे होतो. भीमा नदीचे पाणलोट क्षेत्रफळ ४६,००० चौरस किलोमीटर इतके आहे महाराष्ट्रात पावसाळ्यात भीमा नदीला अनेकदा पूर येतो. नदीवर एकूण बावीस धरणे आहेत. भीमा पंढरपूर जवळून पाहताना चंद्रकोरीप्रमाणे वळण घेते. म्हणून तिला पंढरपुरात चंद्रभागा असेही असे म्हणतात. भीमा नदी काठची मंदिरे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर चे मंदिर, सिद्धटेक येथील अष्टविनायकांपैकी एक असलेले गणपतीचे मंदिर, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील विठोबाचे मंदिर, कर्नाटकातल्या गाणगापूरचे दत्त मंदिर ते गुलबर्गा जिल्ह्यात आहे.
कृष्णा नदी
कृष्णा नदी - महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची कृष्णा नदी आहे. कृष्णा नदीचा भारतातील सर्वात लांब नदी यांच्या यादीमध्ये तिसरा क्रमांक येतो. कृष्णा नदीचा उगम सह्याद्रीमध्ये महाबळेश्वर जवळ होतो. ही नदी भारताच्या महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश मधून वाहते. कृष्णा नदी १४०० किलोमीटर वाहते. कृष्णा नदी हॅमसला देवी या ठिकाणी आंध्रप्रदेश राज्यात बंगालच्या उपसागरास मिळते. वेण्णा, कोयना, वारणा, पंचगंगा, तुंगभद्रा, घटप्रभा, भीमा इत्यादी कृष्णा नदीच्या उपनद्या आहे कृष्णा नदीवरील महत्त्वाची धोम धरण, अलमट्टी धरण, श्री शैल्यम धरण, नागार्जुन सागर धरण ही आहेत.
गोदावरी नदी
गोदावरी नदी - गोदावरी नदी महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठी आणि सर्वात लांब नदी आहे. गोदावरी नदी भारतातील सर्वात लांब नदी यांच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे. गोदावरी नदी या नदीला दक्षिणगंगा असेही म्हटले जाते. गोदावरीचा उगम त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ब्रह्मगिरीच्या पर्वत रांगातून होतो. गोदावरी नदी १४६५ किलोमीटर वाहते. इंद्रावती, मंजीरा, बिंदुसरा इत्यादी गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत. या नदीवरील महत्त्वाची धरणे औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे धरण गोदावरी नदीवर आहे. गंगापूर धरण गोदावरी नदीवरच नाशिक जिल्ह्यात आहे. तसेच नांदूर मध्यमेश्वर धरण देखील नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीवर आहे. गोदावरी नदी आंध्रप्रदेश राज्यात राज महेंद्रवरमन शहराजवळ अनेक शाखा विभक्त होऊन पुढे बंगालच्या उपसागरास मिळते.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

मोबाईल हरवण्याची चिंता आहे? तर आता चिंता नको.