Ticker

6/recent/ticker-posts

नाशिक जिल्हा संपूर्ण माहिती - माझा महाराष्ट्र

 

              नाशिक जिल्ह्यातील १५ तालुके
                    नाशिक जिल्हा लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्रातील ३ क्रमांकाच्या जिल्हा म्हणून नाशिक जिल्हा परिचित आहे. नाशिक जिल्ह्याचे क्षेत्रफळ १५,५८२ चौ.किमी इतके असून येथील लोकसंख्या ६१ लाखाहून अधिक आहे. भगवान राम,लक्ष्मण आणि सीता आपल्या वनवासाच्या काळात गोदावरी काठच्या वनातच वास्तव्याला होते.येथे लक्ष्मणाने रावणाच्या बहिणीचे नाक कापले होते. संस्कृतमध्ये नाकास नासिका असे म्हटले जाते. म्हणून त्यावरून नाशिक हे नाव पडले असावे. तर मोगल साम्राज्याच्या काळात नाशिक गुलाबांचे शहर म्हणून गुलशनाबाद या नावाने प्रसिद्ध होते. इतकेच नाही तर नऊ शिखरांचे शहर म्हणून नवशिख आणि नंतर अपभ्रंश होऊन नाशिक असा एक मतप्रवाह आढळून येतो. याशिवाय महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदीच्या मान मिळवलेली गोदावरी नदीचा उगम नदीचे उगम सह्याद्री पर्वतात नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी पर्वतावर झालेला आहे. गोदावरी व्यतिरिक्त वैतरणा, भीमा, कष्यापि, गिरणा, धारणा इत्यादी महत्त्वाच्या नद्या नाशिक मधून वाहतात. नाशिक जिल्ह्याला धुळे, जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, ठाणे, गुजराततील बलसाड, डांग नवसारी जिल्ह्याची सीमा लागून आहे. या जिल्ह्यात मराठी भाषा मोठ्या प्रमाणावर बोलली जाते. जिल्ह्यातील निफाड, लासलगाव परिसर कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. तर नाशिक जिल्हा हा द्राक्षांचा जिल्हा म्हणून सर्वदूर ओळखला जातो. यासोबतच वाईन निर्मितीसाठीही नाशिक प्रसिद्ध आहे. त्यामुळे वाईन कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून आता नाशिक ने नाव काळानुरूप नावारुपास येत आहे. नाशिक जिल्ह्याचे कमाल तापमान ४१.२ सेल्सिअस तर किमान तापमान ८.७ सेल्सियस इतके आहे. तर जिल्ह्याची समुद्रसपाटीपासुन उंची समुद्रसपाटीपासून उंची ५६५ मीटर इतकी आहे. जिल्ह्यातील पश्‍चिम भागातील इगतपुरी, सुरगाना व पेठ तालुक्यात दोन हजार मिलिमीटर इतका पाऊस पडतो. मात्र पूर्वेकडे याचे प्रमाण एकदम कमी कमी होत जाते. सुरगाना, पेठ,  इगतपुरी चे हवामान कोकण सारखे आहे. तर निफाड, सिन्नर, दिंडोरी, बागलाण विभाग पश्चिम महाराष्ट्र सारखा आहे. तर येवला, नांदगाव, चांदवड विभाग विदर्भ विभागा सारखा आहे. यामुळे नाशिकला मिनी महाराष्ट्र म्हणून देखील ओळखली जाते. नाशिक जिल्ह्यात काळाराम मंदिर, धम्मगिरी रामकुंड, श्री सोमेश्वर मंदिर, पांडवलेणी, पंचवटी, मांगी-तुंगी, बारा ज्योतिर्लिंगापैकी एक गणले जाणारे त्रंबकेश्वर, गंगापूर येथे गोदावरी नदीवर बांधण्यात आलेले देशातील पहिले मातीचे धरण, सापुतारा हे निसर्गरम्य स्थळ व थंड हवेचे ठिकाण, नांदूर मध्यमेश्वर येथील भरतपूर अभयारण्य सिन्नर ही यादव साम्राज्याची सुरुवातीची राजधानी साडेतीन पीठापैकी एक पीठ सप्तशृंगी माता,

मालेगांव भुईकोट किल्ला
मालेगाव येथील पेशव्याचे सरदार नारोशंकर यांनी बांधलेला भुईकोट किल्ला आदी अनेक पर्यटन स्थळे नाशिक जिल्ह्यात आहे. भारतातल्या चार कुंभमेळा पैकी सिंहस्थ कुंभमेळ्याचे क्षेत्र नाशिक असून या ठिकाणी दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो.
नाशिक कुंभमेळा
 
तर नाशिकच्या त्रंबकेश्वर येथे हिंदू वंशावळीची नोंद केली जाते. नाशिक जिल्ह्यात सटाणा, सुरगाना, मालेगाव, देवळा, पेठ, दिंडोरी, चांदवड, नांदगाव, नाशिक, निफाड, इगतपुरी, सिन्नर, येवला, कळवण, त्र्यंबकेश्वर, असे एकूण 15 तालुके आहेत. नाशिक जिल्ह्यात सह्याद्री गाळणा, साल्हेर - मुल्हेर, वनी, चांदवड सातमाळा रांगा आणि मालेगावचे पठार अधिक पर्वत डोंगर रांगा आहेत. तर ब्रह्मगिरी, साल्हेर-मुल्हेर, अंकाई-टंकाई, मांगी तुंगी यासारखी अनेक महत्त्वाची जोडकिल्ले येथे आहे. याच नाशिक जिल्ह्यात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था, महाराष्ट्र राज्य पोलीस अकादमी, चलनी नोटा, पोस्टकार्ड, तिकिटे छापण्याचा कारखाना, ओझर येथे मिग विमानाचा कारखाना, इगतपुरी येथे निलगिरी पासून कागद निर्मितीचा कारखाना तर देवळाली येथे सैन्याचे प्रशिक्षण केंद्र आहे. या याठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह केला. तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मित्रमेळा या संघटनेची स्थापना केली होती. क्रांतिकारकांचे जणू तीर्थक्षेत्र ठरलेल्या या शहरातील विजयानंद थिएटरमध्ये अनंत कान्हेरे या महाराष्ट्राच्या सुपुत्राने कलेक्टर जॅक्सनचा वध केला. तर प्रसिद्ध नाटककार वसंत कानेटकर ज्ञानपीठ विजेते साहित्यिक वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची ही कर्मभूमी होय. तर येवला  हे तात्या टोपे यांचे जन्मगाव आहे. विशेष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी येथे आपला धर्मांतराचा निर्णय जाहीर केला होता. तर भगूर हे गाव स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

मोबाईल हरवण्याची चिंता आहे? तर आता चिंता नको.