Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय तत्त्वज्ञानाची महती जगभर पसरवणारे नरेन्द्रनाथ दत्त उर्फ स्वामी विवेकानंद, भारतीय तत्त्वज्ञ यांचे अनमोल विचार

 भारतीय तत्त्वज्ञानाची महती जगभर पसरवणारे नरेंद्रनाथ  दत्त उर्फ स्वामी विवेकानंद, भारतीय तत्त्वज्ञ यांचे अनमोल विचार 

आपल्या देशात असे अनेक महापुरूष होऊन गेले आहेत. ज्याचं जीवन आणि विचार आजही आपल्याला बरंच काही देऊन जातं. त्यांचे विचार असे होते की, जे निराश व्यक्तीने वाचले तर त्यांच्या जीवनाला नवं ध्येयं मिळू शकतं. यापैकीच एक महापुरूष म्हणजे स्वामी विवेकानंद. ज्यांचा जन्मदिवस 12 जानेवारी हा भारतात राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो. 

  ------ थोर भारतीय तत्वज्ञ यांचे अनमोल विचार ------

1)  आपल्या दुर्दशेचं कारण नकारात्मक शिक्षा प्रणाली आहे.

2) आपल्याला अशा शिक्षणपद्धतीची गरज आहे जे काळाला अनुसरून असेल.

3) हजार वेळा ठेच लागल्यानंतरच एक चांगलं चरित्र निर्माण होतं.

4) जर धन हे दुसऱ्यांच्या फायद्यासाठी मदत करत असेल तर त्याचं मूल्य आहे नाहीतर ते फक्त वाईटाचा डोंगर आहे. त्यापासून जितक्या लवकर सुटका मिळेल तितकं चांगलं आहे.

5) जी व्यक्ती गरीब आणि असहाय्य व्यक्तींसाठी अश्रू ढाळते ती महान आत्मा आहे. तसं नसेल तर ती दुरात्मा आहे.
6) स्वतंत्र होण्याचं धाडस करा. जिथपर्यंत तुमचे विचार जात आहेत तिथपर्यंत जाण्याचं धाडस करा आणि ते तुमच्या रोजच्या जगण्यातही आणण्याचं धाडस करा.
7) आपल्याला अशा शिक्षणपद्धतीची गरज आहे जे काळाला अनुसरून असेल.
8) जेव्हा लोकं तुम्हाला शिव्या देतात तेव्हा त्यांना आशिर्वाद द्या. असा विचार करा ते लोकं तुमच्यातील वाईट गोष्ट काढून तुमचीच मदत करत आहेत.
9) कोणंतीही गोष्ट जी तुमच्या शारीरिक, बौद्धीक आणि आध्यात्मिक रूपाने कमकुवत बनवतात, त्या गोष्टी विषसमान मानून नका दिला पाहिजे.
10) सर्वात मोठा धर्म म्हणजे आपल्या स्वभावाप्रती खरं असणं. स्वताःवर विश्वास ठेवा.
11) जो अग्नी आपल्याला उब देतो तोच अग्नी आपल्याला नष्टही करू शकतो. पण हा अग्नीची दोष नाही.
12) कोणाचीही निंदा करू नका. जर तुम्ही कोणाच्या मदतीसाठी हात पुढे करू शकत असाल तर नक्की करा. जर ते शक्य नसेल तर हात जोडा आणि त्यांना आशिर्वाद द्या आणि त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या.
13) सत्यासाठी काही सोडून द्यावं पण कोणासाठीही सत्य सोडू नये.
14) विश्व एक व्यायामशाला आहे, जिथे तुम्ही स्वतःला मजबूत बनवण्यासाठी येता.
15) महान कार्यासाठी महान त्याग करावा लागतो.
16) धन्य आहेत ते लोकं जे दुसऱ्यांच्या सेवेसाठी आपलं आयुष्य खर्च करतात.
17) स्वतःचा विकास हा तुम्हाला स्वतःहूनच करावा लागेल. ना कोणी तुम्हाला तो शिकवतो ना कोणतंही अध्यात्म तुम्हाला घडवू शकतं. कोणीही दुसरं शिक्षक नाही उलट तुमची आत्मा आहे.
18) जी लोकं नशीबावर विश्वास ठेवतात ती लोकं भित्री असतात. जे स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात.
19) असं कधीच म्हणू नका की,मी करू शकत नाही. कारण तुम्ही अनंत आहात, तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता.
20) जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत देवालाही तुमच्याबाबत विश्वास वाटत नाही.
21) दिवसातून कमीतकमी एकदा स्वतःशी नक्की बोला. नाहीतर तुम्ही तुमच्यातील एका उत्कृष्ट व्यक्तीसोबतची बैठक गमावाल.
22) अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा.
23) पावित्र्य, धैर्य आणि दृढ़ता, या तिन्ही गोष्टी यशासाठी आवश्यक आहेत.
24) जर तुम्ही मला पसंत करत असाल तर मी तुमच्या हृदयात आहे. जर तुम्ही माझा द्वेष करत असाल तर मी तुमच्या मनात आहे.
25) जर आपण परमेश्वराला आपल्या हृदयात आणि प्रत्येक जीवंत प्राण्यात पाहू शकत नाही तर आपण त्याला शोधायला कुठे जाऊ शकतो.
26) वारंवार देवाचं नाव घेतल्याने कोणी धार्मिक होत नाही. जी व्यक्ती सत्यकर्म करते ती धार्मिक असते.

(अश्याच प्रकारची महत्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी आपल्या ब्लॉगला नेहमी भेट द्या आणि ही माहिती जितके शेअर करता येईल करा. यामुळे इतरांना स्वामी विवेकानंद यांचे विचार वाचनात येईल.)    
                                                                     - धन्यवाद 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

मोबाईल हरवण्याची चिंता आहे? तर आता चिंता नको.