Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोयना धरण - माझा महाराष्ट्र

महाराष्ट्रात अनेक स्थळ आहेत सैर करण्यासाठी परंतु आज आपण सैर करणार आहोत. महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण 'कोयना धरण' याबद्दल आपण या लेखाच्या माध्यमातून सैर करणार आहोत. (संदर्भ-Google)
आपल्याला हा लेख कसा वाटला हे नक्की कंमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा.
कोयना धरण
                      महाराष्ट्रातील अनमोल खजिना म्हणजे कोयना धरण. कोयना हे धरण कोयनानगर पाटण तालुका सातारा जिल्ह्यात आहे. हे धारण महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखली जाते. कोयना नदीवर असलेले महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण इसवी सन 1956 ते 1962 या काळात वीजनिर्मितीसाठी उभारण्यात आले होते. याच कोयना जलाशयाच्या काठाला अभयारण्य आहे.  या धरणावर वीजनिर्मिती व सिंचन अशा महत्वपूर्ण गरज भागवली जाते. व महाराष्ट्र राज्याला विकासात स्वयंपूर्ण बनविणारा प्रकल्प म्हणून कोयना प्रकल्पाकडे बघितल्या जाते.  या धरणात साधारणतः  98.78 अब्ज घनफुट पाण्याची साठवण करता येते. कोयना धरणाची उंची 103.02.मी असून लांबी 807.72 मी इतकी आहे. या धरणाचे दरवाजे (S) या आकाराचे असून लांबी 88.71 मी तर सर्वोच्च विसर्ग 5465 घनमीटर/सेकंद इतकं आहे. कोयना धरणाचे एकूण सहा दरवाजे आहेत. याच कोयना जलाशयाला शिवसागर जलाशय असे म्हणतात. हा जलाशय त्याच्या निसर्गरम्य वतावणासाठी परिचित आहे. या जलाशयाच्या दुसऱ्या टोकाला तापोळा नावाचे गांव आहे. येथे कोयना, सोळशी व कांदोटा या नद्यांचा संगम होतो. या परिसरात भ्रमण करण्यासाठी बोटिंग व इतर सोयीसुविधा उपलब्ध आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

मोबाईल हरवण्याची चिंता आहे? तर आता चिंता नको.