Ticker

6/recent/ticker-posts

थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची माहिती व यांचे प्रेरणादायी विचार

 थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची माहिती व यांचे प्रेरणादायी विचार


                     भारतातील अनेक स्वातंत्र्य सैनिकांपैकी एक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव आदराने घेतले जाते. यांच्या नामात देशभक्ती आणि प्रेरणेची एक वेगळीच ऊर्जा आहे. याच व्यक्तीने तरुणांच्या मनात जोश निर्माण केले. आणि आझाद हिंद सेना ब्रिटिशांविरुद्ध उभी केली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जन्म 23 जानेवारी 1897 साली ओडीसामध्ये कटक या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जाणकिनाथ तर आईचे नाव प्रभावती असे होते. नेताजींचे सुरुवातीचे शिक्षण कटकमध्ये पूर्ण झाले. 1921 मध्ये इंग्लंडला जाऊन भारतीय नागरी सेवेची परीक्षा पास केली परंतु इंग्रज सरकारची चाकरी करायला साफ नकार दिला. त्यांनी राजीनामा दिला आणि मायदेशी परतले. भारतात परतल्यानंतर मुंबईला जाऊन महात्मा गांधी यांना जाऊन मिळाले. त्यावेळी इंग्रज सरकारच्या विरोधात असहकार आंदोलन चालू होते. नेताजींनी या आंदोलनात सहभागी घेतला. या नंतर ते महानगर पालिकेच्या प्रमुख कार्यकारी अधिकारी बनले व कोलकात्यातील रस्त्यांची इंग्रजी नावे बदलून त्यांना भारतीय नावे दिली. लवकरच नेताजी भारतातील युवा नेता म्हणून ओळखले जाऊ लागले. 26 जानेवारी 1931 ला नेताजींनी तिरंगा फडकवत एका विराट मोर्च्यांचे नेतृत्व केले. तेव्हा लाठी हल्ल्यात ते जखमी झाले. आणि त्यांना तुरुंगवास झाला. त्यांना आपल्या जीवनात एकूण अकरा वेळा तुरुंगवास भोगावा लागला. 1938 साली गांधीजींनी नेताजींना कोंग्रेसचे अध्यक्ष बनवले. तरीही गांधीजींना नेताजींनी कार्यपद्धती पसंत नव्हती. गांधीजींचा नेताजींना विरोध होता. विरोध असूनही ते काँग्रेसच्या निवडणुकीत ते विजयी झाले. शेवटी 29 एप्रिल 1939 रोजी काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. डिसेंबर 1940 मध्ये त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. पण ते नजकैदेतून सुटून ते जर्मनीला गेले. नंतर त्यांनी "आझाद हिंद सेनेची" स्थापना केली. अश्याप्रकारे त्यांनी स्वातंत्र्य युद्धात त्यांनी आपले योगदान दिले. नेताजींनी दिलेला 'जय हिंद' चा नारा हा आज भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे. या महान देशभक्ताचे विमान अपघातात 18 ऑगस्ट 1945 रोजी निधन झाले. पण त्यांचे कार्य आणि प्रेरणादायी विचार अमर आहेत. तेच प्रेरणादायी विचार खालील प्रमाणे-

1) संघर्षाने मला मनुष्य बनवले, माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला जो माझ्यात आधी नव्हता. 

2) कर्माच बंधन तोडणं हे खूपच कठीण काम आहे. 

3) तुमचं भविष्य हे तुमच्याच हातात आहे. 

4) कधीही अधीर होऊ नका. तसंच कधीही अपेक्षा करू नका की, ज्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात अनेकांनी आयुष्य समर्पित केलं ते तुम्हाला एक-दोन दिवसातच मिळेल.

5) व्यर्थ गोष्टीमध्ये कधीही वेळ घालू नका.

6) "एक व्यक्ती विचार करू शकतो, पण हाच विचार त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर एक हजार आयुष्यात जन्म घेईल."

7) " मी माझ्या अनुभवातून शिकलो आहे की, जेव्हा मी जीवनात भरकटलो तेव्हा कोणत्या तरी किरणाने मला साथ दिली आणि जीवनात भरकटू दिले नाही."

8) "आईचं प्रेम हे स्वार्थविरहित आणि सर्वात निस्सीम असतं. हे प्रेमाचे मोजमाप कोणत्याही मापाने करता येणार नाही."

9) राष्ट्रवाद हा मानव जातीच्या उच्चतम आदर्श सत्य, शिव आणि सुंदरतेने प्रेरित आहे. एक खऱ्या सैनिकांसाठी सैन्य आणि अध्यात्म या दोन्हींच्या प्रशिक्षणाची गरज आहे.

10) यशाचा दिवस हा दूर असेल पण तो येईलच हे मात्र नक्की.

11) आपला मार्ग भलेही कठीण असो, आपला प्रवास कितीही खडतर असला तरी पुढे गेलेच पाहिजे. 

12) जर संघर्षच नसेल, कोणतेही भय समोर नसेल तर जीवनातील अर्धा रस संपेल.

13) जीवनामध्ये प्रगतीचा आशय हा आहे की, निःसंकोचपणे शंका उपस्थित करा आणि त्याच समाधान मिळवण्याचा प्रयत्न करा. 

14) अपयश हाच कधी-कधी यशाचा स्तंभ असतो. 

15) एवढं ते तुम्हीही मानत असालच की, एक ना एक दिवस मी तुरुंगातून मुक्त होईन. कारण प्रत्येक दुःखाचा अंत निश्चित आहे. 

16) "फक्त मनुष्यबळ, पैसा आणि वस्तूंच्या जीवावर स्वातंत्र्य मिळवता येणार नाही. आपल्याकडे प्रेरणा देणारी शक्तीही असली पाहिजे. जी आपल्याला सहसपूर्ण काम करण्याची प्रेरणा देईल."

17) "तुम मुझे खून दो में तुम्हे आझादी दूंगा ।" 

(तुम्ही बलिदान द्यायला तयार राहा, मी तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून देईल.)

18) भारत के भाग्य को लेकर आप कभी निराश न होना। दुनियामें ऐसी कोई ताकत नहीं है जो भारत को गुलाम बनाकर रख सके, भारत आझाद होगा और वह भी जल्द ।

19) याद रखो की अन्याय और गलत चींजों से समझौता करना सबसे बड़ा अपराध है ।

20)चर्चाओं से इतिहास में कभी वास्तविक बदलाव नहीं आया ।

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

मोबाईल हरवण्याची चिंता आहे? तर आता चिंता नको.